अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : आरक्षण हक्क कृती समिती च्या वतीने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यलय अकोला वर आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते तरी हा आक्रोश मोर्चा मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा निर्णय त्वरित रद्द करून मागासवर्गीय समाजातील नोकरदार वर्गावर अन्याय कारक असून त्वरित रद्द करावा ह्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ह्या आक्रोश मोर्चात सर्व मागासवर्गीय कर्मचारी संघटना अधिकारी कर्मचारी व राजकिय पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले),अनुसूचित जाती विभाग काँग्रेस,युवा स्वाभिमानी पार्टी,अनुसूचित जाती विभाग राष्ट्रवादी काँग्रेस, सम्राट अशोक सेना, आक्रमण संघटना,ईगल ग्रुप,नारी शक्ती सेवा फौंडेशन, ग्रामीण युवा संघटना,रिपब्लिकन सेना,प्रहार बहुद्देशीय संस्था, आदींसह असंख्य सामाजिक कार्यकर्ते कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.