चक्का आंदोलनात गरजले आमदार बंटीभाऊ भांगडिया
चिमुरात भाजपचे ओबीसी राजकीय आरक्षण चक्काजाम आंदोलन
शेकडो ओबीसी कार्यकर्ते यांची उपस्थिती
आमदार बंटीभाऊ भांगडिया सहित शेकडो कार्यकर्त्यांना केली अटक .
जिल्हा प्रतिनिधी
विकास खोब्रागडे
चंद्रपुर/-ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण पूर्वरत ठेवण्यासाठी राज्यात एक लाख ओबीसी बांधव भाजप च्या माध्यमातून आंदोलन करीत आहे.राज्यात कोणतीही समस्या उदभवल्यास केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा कांगावा आघाडी सरकार करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्याची मुदत दिल्या नंतर ही महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही.राज्यातील मराठा ,ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सरकार असतांना मंत्री मोर्चे काढत आहेत ही एक शोकांतिका आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना पीक विमा,बोनस ,पुरपीडित मदत, संजय गांधी निराधार योजना मानधन आदी मदत दिली नाही. देशात 40 टक्के कोविड टक्के रुग्ण आढलले आहे परंतु आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करीत आहे भाजप चे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वात ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ओबीसी विभागाचे मंत्री यांना आपल्या ओबीसी ची माहिती देऊ शकले नाही. कोटी ओबीसी बांधवांकडे लक्ष देऊ शकत नाही चिमूर क्रांती भूमीतून ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा संकल्प आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी केला.ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्वरत ठेवण्यासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन भाजप कार्यालयातून आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या नेतृत्वात निघून गगन भेदी घोषणा देत हजारे पेट्रोलपंप जवळ येऊन चक्काजाम आंदोलन केले .या आंदोलनात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, नवी सत्ता नवा मंत्र ओबीसी आरक्षण करण्याचा तंत्र , ओबीसी समाजाचे खरे गुन्हेगार महाविकास आघाडी सरकार ,आता झाला इरादा पक्का ऐकले नाही तर देऊ धक्का अश्या गगनभेदी घोषणा दिल्या.चक्काजाम आंदोलनात यांनी ओबीसी समाजाच्या हितासाठी भाजप कटीबद्ध असल्याचे सांगत राजु झाडे, वसंत वारजुकर एकनाथ थुटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका सत्र सोडले.
संचालन राजु देवतळे, प्रास्ताविक राजु झाडे व आभार जयंत गौरकर यांनी व्यक्त केले . दरम्यान राज्य शासनाला तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. चक्का जाम आंदोलन केल्यानंतर आमदार बंटीभाऊ भांगसहित इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. चक्काजाम आंदोलनात वसंत वारजुकर जीप उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर भाजपजिल्हा सचिव राजू देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, एकनाथ थुटे ,सुरज नरुले, रमेश कंचर्लावार, प्रफुल कोलते पुडलीक मत्ते समीर राचलवार बंटी वनकर सचिन फरकाडे महादेव कोकोडे सौ पायल कापसे सौ छायाताई कंचर्लावार, सौ ज्योती ठाकरे सौ निताताई लांडगे कल्याणी सातपुते गीता लिंगायत आशा मेश्राम भारती गोडे रत्नमाला मेश्राम कनीलाल नाका डे सचिन बघेल अमित जुमडे निखिल भुते भूषण डाहुले पस सदस्य प्रदीप कामडी, प्रवीण गणोरकर असिफ शेख, गजू गुळध्ये किशोर नेरलावार लीलाधर बनसोड विनोद खेडकर सरपंच रंजना दडमल उपसरपंच निर्मला वाघमारे विनोद चोखरे एकनाथ धोटे संदीप पिसे पिंटू खाटीक मनी रॉय सरपंच संकेत सोनवने नितेश दोडके अविनाश बारोकर अनिल शेंडे सौ वर्षा लोणारकर ,वर्षा शेंडे नाजमा शेख पुष्पा हरणे रत्नमाला मेश्राम शेकडो आदी उपस्थित होते.