सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : आल्लापली ते भामरागड या मुख्य मार्गावर भरगाव वेगाने चालणाऱ्या ओवरलोड ट्रकामुळे उडणाऱ्या धुळीने नागरिक हैरान झाले आहेत.तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आलापली ते भामरागड या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असुन त्यात अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे नाल्याचे पुल बांधकाम व चंद्रा जवळील बांडीया नदी पुलाचे बांधकाम,भामरागड येथे पर्लकोटा नदीला पुलाचे बांधकाम तसेच मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर कामाकरिता तेलंगानातुन मोठ्या प्रमाणात ट्रकाने गिठ्ठी,मिस्क डांबर, सिमेंट पावडर व इतर साहीत्य आणली जात आहे.या नेहमी भरगाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या रस्त्यावरिल धुळीमुळे या मार्गावर असलेले तलवाडा,मेडपली,पेरमिली,चंद्रा,ताडगाव,लोकबिरादरी हेमलकसा व भामरागड इत्यादी 8 गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.या वाहनांचा सबंधित विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.या मार्गावरील गावात रस्त्याला लागुन अनेक घरे, दुकाने,हॉटेल व इतर कार्यालय आहेत.भरगाव वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे घरांमध्ये धूळ शिरते,धूळ हा श्वसनाच्या आजारांसाठी धोकादायक घटक आहे.तसेच घरातील भांडी व इतर वस्तूंवर धूळ उडत आहे.ढिसाळ कारभारामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहनांची ये-जा करताना वेगावर नियंत्रण ठेवण्यास सांगितल्यास धुळीचा त्रास कमी होऊन रस्त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी फवारले तर धुळीचे प्रमाण कमी होईल.त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


