पथ्रोट : भीमराव सदाफळे यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दिनेश भीमराव सदाफळे वय 21 यांचा मृत्यू झाला. काल रात्री ९ वाजता ही घटना घडली. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता भीमराव सदाफळे यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला आग लागली. घरात उपस्थित असलेले भीमराव सदाफळे, त्यांची पत्नी व सून घराबाहेर धावले. मात्र त्यांचा मोठा मुलगा दिनेश गंभीर भाजला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूरला नेण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.