सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे 14 फेब्रुवारीला पहील्यांदाच महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम जाती संघ गडचिरोली तालुका शाखा अहेरी कडुन प्रभु श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.जयंती निमित्त प्रमुख मार्गदर्शक सुरेश मांढवगडे हे होते.तर प्रमुख अतिथी पेरमिलीचे सरपंचा किरण नैताम,माजी सरपंच प्रमोद आत्राम,ग्रामपंचायत सदस्य साजन गावडे,अहेरी तालुका अध्यक्ष ईश्वर मांढवकर,प्राचार्य विनोदजी बावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रभु श्री विश्वकर्मा जयंती साजरी करून संलग्न नूतन पेरमिली लोहार शाखा संघाची स्थापना करण्यात आली.अध्यक्ष म्हणून रविंद्र औतकर, उपाध्यक्ष कवीश्वर चंदनखेडे,सचिव रघुनाथ औतकर,युवा अध्यक्ष देवानंद चंदनखेडे यांची निवड करण्यात आली.महिला शाखा अध्यक्ष म्हणून सविता चंदनखेडे,सचिव भारती औतकर,कार्याध्यक्ष रुपाली चंदनखेडे तर सह सचिव म्हणून रंजना हजारे यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून मार्गदर्शन करण्यात आले.या नंतर कार्यक्रमात सांस्क्रुतीक कार्यक्रम घेण्यात आले.सदर कार्यक्रमास सत्यनारायन चंदनखेडे,सीताराम मडावी,बापु औतकर,विनोद मडावी,माधव चंदनखेडे,तुळशीराम चंदनखेडे,गजानन मडावी,तिरुपती कोसरे,मोरेश्वर चंदनखेडे,मंदा चंदनखेडे ,जया औतकर,दर्शना हजारे,लोहार समाजातील बहुसंख्य महिला भगिनी व परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.सदर कार्यक्रमात लोहार संघाच्या वतीने भोजऩाची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र औतकर यांनी केले. प्रास्ताविक रमेश बामनकर तर आभार प्रदर्शन प्राचार्य विनोद बावणे यांनी केले.










