नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : मोबाइल फोनचा वापर करणं आजपासून महागणार आहे. Airtel नंतर Vodafone Idea नेही सर्व प्रीपेड प्लॅन्समध्ये 25 टक्क्यांची वाढ केली आहे. वाढलेल्या किंमती आजपासून लागू झाल्या आहेत.आता Vodafone Idea ग्राहकांना आधीच्या तुलनेत जवळपास 25 टक्के अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. Vodafone Idea चा बेसिक प्लॅन जो आतापर्यंत 79 रुपये होता, तो वाढून आता 99 रुपये झाला आहे. टॉपअप पॅक 48 रुपयांच्या जागी 58 रुपये इतका झाला आहे. दररोज 1.5 GB डेटा पॅक 249 रुपयांच्या जागी आता 299 झाला असून या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. 1 GB डेटा पॅक 269 रुपये झाला आहे, जो आधी 219 रुपये होता.
2 GB डेटा पॅकची किंमत 299 रुपयांवरुन 359 रुपये झाली आहे. 24 GB वार्षिक डेटा पॅक 1499 रुपयांऐवजी 1799 रुपये झाला आहे.149 रुपयांचा प्लॅन 179 रुपये – वोडाफोन-आयडियाचा सर्वाधिक विक्री होणारा 149 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपये झाला आहे. या प्लनची वैधता 28 दिवस आहे.
त्याशिवाय 2 GB डेटा, 300 SMS आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा मिळते. दरम्यान, वोडाफोन-आयडियाआधी एयरटेलनेही प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. Airtel चा 79 रुपयांचा प्लॅन आता 99 रुपये झाला आहे. 149 रुपयांचा प्लॅन 179 रुपये झाला असून याची वैधता 28 दिवस आहे.
यात अनलिमिडेट कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2GB डेटा मिळतो. Airtel ने टॅरिफ वाढवण्याची घोषणा केल्याच्या एक दिवसानंतर Vodafone-Idea नेही टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, याआधी टेलिकॉम कंपन्यांनी डिसेंबर 2019 मध्ये आपल्या टॅरिफमध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ केली होती. त्यावेळी Airtel ने रिचार्ज प्लॅन 49 रुपयांनी वाढवून 79 रुपये केला होता.