अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतनिधी मालेगांव
मालेगाव दि 14 – मालेगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवाभोजन केंद्रास ता 10 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरुवात करण्यातआली .त्याचा लाभ शेतकरी व हमाल यांना मिळणारआहे.आदिशक्ती शिक्षण व्यायाम क्रीडा व युवक कल्याण संस्था मालेगाव द्वारा हे शिवाभोजन केंद्र सुरू करण्यात आला. मालेगांव कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये दररोज बाहेर गाँव हून तसेच गावातील बरेच शेतकरी व व्यापारी येत असतात. याचा विचार करून व त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे अपेक्षित होते.या अनुषगाने या शिवभोजन केंद्राचे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी नगर पंचायत चे मुख्याधिकारी डॉ विकास खंडारे ,कृषीउत्पन्नबाजारसमितीचेसभापती किसनराव घुगे,सचिव दिलिप वाझुळकर ,अखिलभारतीय महात्माफुले समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे,जिल्हा उपाध्यक्ष सेवाराम आडे रा कॉ चे शहर अध्यक्ष अरुण बळी ,रवी बळी नामदेव बळी ,अशोकराव घूगे ,सेवा सहकारीसंस्थाचे अध्यक्ष रामचंद्र बळी ,डॉ योगेश गाभणे ,समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संतोष गोमाशे,जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भागवत ,कपिल भालेराव ,सागर वाघ,शिवाजी बळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश उंडाळ आदी उपस्थित होते.यावेळी कृउबासचे सभापती घुगे म्हणाले की या शिवभोजन केंद्राचा लाभ हमाल शेतकरी मापारी यासह सामान्य नागरिकांना सुद्धा मिळणारआहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.