किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी
साप्ताहिक अधिकार नामा पातूर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद च्या वतीने महाविकास आघाडी सरकार विरोधात 7 मे 2021 रोजी 33 टक्के मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.हा निर्णय मागासवर्गीय कर्मचारी व नोकरदार वर्गा साठी घातक असुन ह्या निर्णयामुळे असंख्य मागासवर्गीय समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे हा निर्णय मागासवर्गीय समाजावर अन्याय कारक निर्णय असून त्याकरिता सुप्रीम कोर्टादवारे कुठल्याही पप्रकारे निर्णय रद्द करण्याचे आदेश नसतांनाही आपण पदोन्नतीतील मागासवर्गीय 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय त्वरित महाविकास आघाडी सरकारकडून माघार घेण्यात यावा.व नोकरदार वर्गावर होणारा अन्याय थांबविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून मागणीचे निवेदन तहसीलदार पातूर मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ह्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली सदरआंदोलन रिपब्लिकन बहूजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर तालुका अध्यक्ष सागर इंगळे व शहर अध्यक्ष प्रमोद डोंगरे ह्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले ह्यावेळी हरिष गुडधे,सुमेध पोहरे,अभिजित किरतकार,अक्षय सुरवाडे, पवन तांबे,आदित्य अवचार,रूपेश अवचार,सुरेंद्र अवचार,आकाश सोनोने,महेश पोहरे,वैभव अवचार,करण बोरकर,शुभम धाडसे, योगेश पदमाणे, निखिल सहस्त्रबुद्धे, श्याम कराळे, तुषार उपर्वट, शंकर गुजर,अमोल अंभोरे,दर्शन गवई ,शुभम हिवराळे,माणिक अवचार,विशाल शेंगोकार,विशाल उपर्वट, सुरज धाडसे, गोविंदा राहुळकर आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


