सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
गेला खरीप हंगाम 20-21 मधील नुकसान ग्रस्त बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत विम्याचा मोबदला मिळाला नाही. नवीन पेरणीची लगबग सुरू झाली. नवीन येणाऱ्या खरीप पीकाचा विमा घेण्याची वेळ आली पंरतु अद्याप गेल्या खरीप हंगामाचा विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. गेल्या खरीप हंगामात जिल्ह्य़ातील (271701) दोन लाख, एकात्तर हजार सातसे एक शेतकऱ्यांनी पीक निहाय पीक विमा भरला होता. शेतकऱ्यांनी विम्यापोटी विमा कंपनीकडे भरलेली एकुण रक्कम , केंद्र सरकारची मदत, राज्य सरकारची मदत असे मिळुन विमा कंपनीकडे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जमा होणारी रक्कम एकुण रक्कम (1063877039) एकसे सहा कोटी, अडोतीस लक्ष, सत्यातर हजार, एकोण चाळीस रूपये जमा झाले. या पैकी सतरा कोटी रूपये नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना दिल्याचे विमा कंपनीकडून व कृषी विभागाकडून सांगण्यात आले. पंरतु कपंनीने शेतकऱ्यांना वाटलेल्या पैशाचे रेकॉर्ड जिल्ह्य़ातील कुठल्याच अधिकाऱ्याकडे अथवा आॅफीस कडे उपलब्ध नाही. गेल्या आनेक वर्षापासून कृषी विभाग, महसूल विभागातील काही उच्च पदस्थ अधिकारी आणि सरकार मधील काही लोकप्रतिनिधीनां हातात धरून विमा कंपन्या हा दरोडा शेतकऱ्यांच्या घरावर टाकतात. केंद्र सरकार व राज्य सरकार कडे शेतकऱ्यांना मदत केल्याचे आकडे असतात पंरतु हजारो कोटी रूपयांची लुट शेतकऱ्यांच्या नावावर चालु आसते याचे भान सरकारला रहात नाही. एका छोटया जिल्ह्य़ात एकसे सहा कोटीरूपये च्या वर जमा करून सतरा कोटी वाटप करतात. तर राज्याची परिस्थिती काय असेल. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र दिले असून किमान ठाकरे सरकारने तरी ठोस निर्णय घ्यावा अन्यथा या लुटी विरोधात भूमिपुत्र कडुन राज्य व्यापी अंदोलन हाती घेणार आसल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.


