संजय लांबे तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी
ब्रम्हपूरी:ग्रामपंचायतच्या माजी सरपंच, महिला मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्ष,पंचायत समितीच्या माजी सभापती, महिला मोर्चाच्या विद्यमान जिल्हाध्यक्षा,असे विविध पदे भूषविणारी तालुक्यातील भूषणावह स्त्रीशक्ती, तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील दिन, दलित, पीडित आणि महिलांच्या अस्मितेच्या अस्तित्वासाठी सदैव जागरूक असणाऱ्या,सर्वांच्या लाडक्या ताई सौ.वंदनाताई अरुणजी शेंडे….वंदनाताईंनी मेंडकी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विराजमान होऊन विजयच मिळविला नाही तर इतिहास घडविला आहे. मेंडकीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदावर सौ.वंदनाताई शेंडे च्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या महिला अध्यक्षा पदावर विराजमान झालेल्या त्या यशस्वी नारीशक्ती ठरल्या…तर उपाध्यक्षपदी युवराज ढोरे यांना सन्मान प्राप्त झाला.भाजपा ज्येष्ठ नेते तथा या विजयाचे शिल्पकार आदरणीय प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनात,भाजपाचे चाणाक्ष प्राचार्य अरुणजी शेंडे माजी तालुकाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी,भाजपा युवा नेते प्रा.यशवंत आंबोरकर संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी, यांच्या यशस्वी नियोजनामुळे हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला. या हर्षविभोर क्षणाचे मान. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी खासदार मान. अशोकभाऊ नेते, जिल्हाध्यक्ष मान. हरिष भैय्या शर्मा, खंबीर युवा नेतृत्व भाजयुमो जिल्हा महामंत्री तनयदादा देशकर, जिल्हा महामंत्री साकेत भानारकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दिवटे,तालुका महामंत्री प्रा.रामलाल महादेव दोनाडकर,प्रसिध्दी प्रमुख प्रा.संजय लांबे,प्रा.चंद्रकांत विटाळकर, डॉ.प्रा.अशोक सालोटकर यांनी कौतुक करून या स्त्रीशक्ती विजयाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.”सर्वांच्या लाडक्या ताई” सौ.वंदनाताई शेंडेंनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.तसेच सोसायटीचे सर्व सदस्य गण सौ.अरुणा रामकृष्ण तिघरे, पुरुषोत्तम ठाकरे,कवडूजी आंबोरकर,प्रकाश ठाकरे,रविंद्र खटू गुरनूले इत्यादींनी अध्यक्षपदावर निवड करून जनतेची सेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे विशेष आभार मानले.त्याचप्रमाणे राजू आंबोरकर,विनायक पाकमोडे, मारोती म्हशाखेत्री,अमोल कोपुलवार,यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आणि “संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व सभासद बंधू भगिनींना समर्पित भावनेने सेवा प्रदान करीन आणि संस्थेची आर्थिक उन्नती कशी होईल याकडे पूर्णवेळ लक्ष देईन.तसेच संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सभासदांचे समर्पित भावनेने काम करून त्यांचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही”. असा प्रबळ आशावाद देखील नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.वंदनाताई शेंडे यांनी व्यक्त केला.






