मिलिंद कांबळे तालुका प्रतिनिधी कीनवट कीनवट: सारखणी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली,या भिम जयंती चे आयोजन गावातील बौद्ध उपासिका महीला मंडळ यांनी उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला शालेय विद्यार्थी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीया करीता केलेल्या कार्यावर प्रकाश टाकून त्यांचें विचार आजही कीती प्रभावी सामाजिक दृष्टीने आज त्या विचारांची समाजाला गरजआहे यांची जाणीव करून दिली,सायंकाळी पाच वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यैल चित्राची भव्य रॅली पारंपरिक पद्धतीने गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली या वेळी सींदखेंड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी चौख बंदोबस्त देऊन मिरवणूक डी जे वर न काढता पारंपरिक पद्धतीने वाध्य लावून काढा असे भिम जयंती मंडळाला आवाहन केले होते त्याला जयंती मंडळानेही प्रतिसाद देत डी जे मूक्त जयंती साजरी करून एक आदर्श निर्माण केला







