दैनिक अधिकारनामाकळंब तालुका प्रतिनिधी :उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मानवांसह जनावरांनाही पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. ही गरज ओळखून दयावान प्रतिष्ठानच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील मुख्य ठिकाणी तसेच नागरिकांच्या मागणीनुसार मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.कळंब शहर तसेच डिकसळ गावातील नागरिकांच्या मागणीनुसार आणि जनावरांच्या पाण्याच्या गरजांचा विचार करून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत एकूण ४७ पाण्याच्या टाक्यांचे वितरण करण्यात आले असून त्या विविध ठिकाणी नियोजनपूर्वक बसविण्यात आल्या आहेत.उन्हाच्या कडाक्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. विशेषतः रस्त्यांवरील भटकी जनावरे, पक्षी तसेच ग्रामीण भागातील जनावरांना याचा मोठा फायदा होणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत दयावान प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे.समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी दयावान प्रतिष्ठान नेहमीच पुढाकार घेत असते. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले असून, भविष्यातही अशाच प्रकारचे लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा निर्धार प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला, उपाध्यक्ष इम्रान काझी, सचिव अभय गायकवाड, युवा उद्योजक समीर सय्यद, करण गायके, तानाजी चव्हाण, रोहित (गोलू) मंडळे, इरफान शेख, मुदतशीर सय्यद, सलमान शेख, हुजेब बागवान, फरमान सय्यद, अलीम दारूवाले तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.दयावान प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे केवळ मुक्या जनावरांना दिलासा मिळाला नसून समाजात माणुसकीचा जिवंत संदेश पोहोचल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.






