संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा सचिव पदी शंकर पाटील यांची निवड
उत्तम फड ग्रामीण प्रतिनिधी उदगीर
उदगीर:- दिनांक 21 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा सचिव पदी शिवश्री शंकर यमाजी राव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हाध्यक्ष (पुर्व)व पत्रकार शिवश्री राजकुमार माने व जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार शिवश्री उत्तमरावजी फड यांनी शिवश्री शंकरा पाटील यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या व इच्छुक कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड कार्यालयाशी संपर्क साधावा व महामानवाच्या व महापुरुषाच्या विचाराच्या संघटनेत प्रवेश करून जनसेवा करावी असे आव्हान केलेआहे. यावेळी लक्ष्मण सावंत सर, डी एस बिरादार सर, गजानन तेलंग, सत्यम माने, दत्तात्रेय बिरादार, कृष्णा भालेराव, सुरज माने, किरण बिरादार इत्यादी उपस्थित होते.









