.अनिस सुरैय्यातालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: राज्य शासनाने गुटख्यावर प्रतिबंध घातला असला तरी पण हा प्रतिबंध कागदोपत्रीच असल्याने गुटखा हा राजरोसपणे विकला जात असुन या गुटखा विक्रीला पोलिसांचा वरदहस्त असल्याने कारंजा या तालूक्यातुन गुटख्याच्या पोत्याने भरलेल्या गाड्या थेट फुलसावंगी येथे जात असल्याची खात्रीदायक माहिती प्राप्त झाली आहे.कारंजा या गावावरुन आलेला गुटखा महागांवच्या मुख्य रस्ते व मुख्य चौकातून जात असुन हा गुटखा नेतेवेळी याची माहिती पोलिसांना देऊन पोलिसांच्या मार्गदर्शनात व सरक्षणात फुलसावंगीला पाठविला जातो दरदिवशी चार ते पाच गाड्या पोत्यात साठविलेल्या गुटख्याच्या गाड्या फुलसावंगी ला खाली केल्या जातात या गुटख्याचे कनेक्शन हैद्राबाद या शहरातुन कारंजा या वाशिम जिल्ह्यातील कारंजा या तालुक्यातुन थेट फुलसावंगीसह यवतमाळ जिल्ह्यात पोहचविला जातो हा मोठ्या प्रमाणात आणुन ठरलेल्या फुलसावंगीसह जिल्हाभर पाठविला जातो गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना दिली जाते पोलिस या गुटख्यावर सरक्षणासाठी सज्ज असतात व पोलिसांच्या मार्गदर्शनात या गाड्या फुलसावंगी कडे मार्गक्रमण जातात याची संपुर्ण माहिती पोलिसांना असते पोलिसच हा गुटखा ठरलेल्या ठिकाणी पाठविण्याचे काम करतात पोलिसांची प्रतिबंधित गुटख्यासाठीच गस्त असते गुटख्याची येत असलेली गाडी क्रमांकासह पोलिसांना माहिती दिली जाते पोलिस या गाड्या सुखरूपपणे गुटखा माफियाच्या घरी पोहचण्यासाठी पोलिस आर्थिक हप्त्यात चोखपणे कामगिरी पार पाडत असतात त्यामुळे गुटखा येत असल्याची खबर फक्त पोलिसांना कळविली जाते त्यासाठी गुटखा खेपेवेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात वरकमाईच्या नावाखाली मोठ्या रक्कमाची मेजवाणी दिली जाते.महागांव तालुक्यासारखा गुटखा सुरक्षित विकण्याचा तालुका अन्य कोणता नसेल या तालुक्यातुन राजरोसपणे गुटख्याच्या गाड्या जात असतांना पोलिस मात्र गुटखा माफियाकडुन मिळणाऱ्या आर्थिक हप्त्यात खुष आहेत शासनाने गुटखा बंदीचे कितीही आदेश काढले तरी त्या आदेशाना पोलिस व अन्न औषध प्रशासन धुळीला मिळवित आहेत या गुटख्यात बाहुबली,राजनिवास,विमल,आर.के. व वाणी सुगंधित तंबाकू या नावाने असुन या गुटख्याचा खप मोठ्या प्रमाणात असुन या गुटख्यामधुन लाखो रुपयाची उलाढाल होतांना दिसत आहे या गुटख्याचे शाळकरी विद्यार्थ्यांसह तालुक्यातील जनता आहारी गेली असुन गुटख्यामुळे या आहारी गेलेल्या लोकांना कर्करोगाने ग्रासले असुन तालुक्यात अनेक जन कर्करोगाने बाधित झाले असुन अनेकजनाना गुटख्याच्या सेवनामुळे कर्करोगाने विळखा घातला असुन अनेक जन कर्करोगामुळे मृत्युमुखी पडले आहेत.गुटखा माफीयाने यामध्ये लाखो रुपयाची कमाई केली आहे.फुलसावंगीचा लाला गुटख्याचा माफिया पोलिस व अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात पैशाची रसद पुरवित असुन पोलिस या रसद मध्ये आपले संरक्षण देऊन थेट हैद्राबादवरुन कारंजा येथे आलेला गुटखा थेट फुलसावंगी च्या गुटखा माफीयांच्या घरापर्यंत पोहचत असल्याने गुटखा माफियानी पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.पोलिस व अन्न औषध प्रशासन गुटखा माफियापुढे हतबल झाले आहे.गुटखा माफियांच्या गुटख्याच्या भरलेल्या गाड्या महागांव येथिल शेख नामक व्यक्तिमार्फत मुख्य चौकातुन फुलसावंगीकडे पोलिंसाच्या संरक्षणात मार्गक्रमण करतात पोलिस गुटखा माफियापूढे नांगी टाकुन गुटखा माफियाचा आदेश शिरसावंधमाणुन गुटखा माफियाची चोख कामगिरी बजावत असतात त्यामुळे गुटखा माफियांना पोलिसांची जराही भेवभिती राहिली नाही.नियंत्रण ठेवणारे अन्न औषध प्रशासन व पोलिस यांचेच पाठबळ असल्याने गुटखा माफियांनी गुटखा व्यवसायातुन कोट्यावधी रुपयाची माया जमविली आहे.पुर्वी फुलसावंगी येथुन बाहुबली नामक गुटख्याची तालुक्यात विक्रि केल्या जात होती.परंतु बाहुबली चा माल शॉर्ट असल्याने आता या गुटखामाफीयाने आपला मोर्चा नजर नामक गुटख्याकडे वळविला आहे तसेच महागांव शहरातील शेख नामक व्यक्ति फुलसावंगी येथिल लाला कडुन हां गुटखा घेवुन तालुक्यात विक्रि करत आहे.तसेच शेख हां संपुर्ण गुटखा ठेवण्यासाठी नेहमी जागा बदलत असतो.कधी शेजा-यांच्या घरी तर कधी प्रभाग ८ मध्ये आपला गुटखा ठेवत असतो.शासनाचे गुटखाबंदीचे आदेश असलेतरी पण फुलसावंगी येथिल गुटखा बंद होणे ही अशक्य बाब असुन गुटख्यावर नियंत्रण ठेवणारच गुटखा माफियाचे पाठीराखे असल्याने गुटखा बंदीसाठी आता अन्न औषध आयुक्त तथा महसुल आयूक्तासह पोलिस आयुक्त यानी शोध मोहिम राबवुन गुटखा माफियांचे प्रस्त संपुष्ठात आणुन गुटख्यासारख्या विषारी पदार्थापासुन व त्यातुन उद्भवणाऱ्या कर्करोगापासुन जनतेची सुटका करुन जनतेला दिलासा देण्याची मागणी तालुक्यातील जनतेतुन करण्यात येत आहे.







