उत्तम फड
ग्रामीण प्रतिनिधी उदगीर
उदगीर:- दिनांक 19 एप्रिल 2026 वार रविवार रोजी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने अभिवादन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर बसवआणा हे बाराव्या शतकातील एक महान भारतीय तत्त्ववेत्ता समाज सुधारक कवी कवी व वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक होते. कर्नाटक येथील बागेवाडी येथे जन्मलेले 1131 1167 कल्याणचा राजा बिजलाच्या दरबारात प्रधानमंत्री होते. त्यांनी समता, बंधुता, कायका, कैलास काम हीच पूजा आणि महिलांच्या समानतेचा संदेश देऊन समाजात क्रांती घडवून आणली अशा महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष व पत्रकार शिवश्री राजकुमार माने, जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार शिवश्री उत्तम फडष पप्पू गायकवाड, पत्रकारअशोक कांबळे, शिवाजी फड, बालाजी रोडे सर,कालिदास निटुरे, प्राध्यापक नागनाथ फड, किरण बिरादार, सुरज माने ,अक्षय होळसंबरे ,शुभम पाटील इत्यादी उपस्थित होते.










