सावित्रीबाई फुले शाळा ओपन जिमचे उद्घाटन.
खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पुढाकार राजाराम काहाळेकर.
पिंजारी माहेमूद
सर्कल प्रतिनिधी :शहापूर
शहापूर: नांदेड जिल्हातील राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या माध्यमातून सीएसआर निधीतून देगलूर शहरातील सावित्रीबाई फुले शाळेमध्ये ओपन जिम बसवण्यात आले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ओपन जिममुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ व निरोगी राहिल व तसेच विद्यार्थ्यांना व्यायामाची सवय लागण्यास मदत होईल.
शालेय विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण भूमिका घेऊन खा. गोपछडे यांनी ही ओपन जिम सावित्रीबाई फुले शाळेसाठी मंजुर करून दिल्यामुळे संस्थेच्या व कर्मचाऱ्याच्या तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.सदरील ओपन जिम चे उद्घाटन देगलूर-बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर, लोकहीत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाराम गजभारे काहाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाराम काहाळेकर, उदघाटक आमदार जितेश अंतापुरकर, प्रमुख पाहुणे शिवाजीराव देशमुख बळेगावकर, नगरसेवक सुमंत कांबळे, नगरसेविका पल्लवी द्याडे, नगरसेवक प्रतिनिधी नाना म ोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्या विशेष उपस्थितीसह लोकहित शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्याध्यापक यापक यशवंतराव गजभारे, सचिव अँड. जयवंतराव गजभारे, सदस्या अनुसयाबाई गजभारे, सदस्य कंधारकर डी एस तसेच संत गाडगे महाराज संस्थेचे विश्वस्त संजय महाराज कीरजवळगेकर, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दोलताबादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग, मातोश्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. प्रकाश वाघमारे निळेगव्हानकर आदी उपस्थितीत होते, या कार्यक्रम ाचे सूत्रसंचालन प्रशांत अस्पतवार यांनी केले आभार विनोद पाटील यांनी मांडले.









