मारोती एडकेवार तालुका: प्रतिनिधी बिलोली
बिलोली : नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते संदीप कटारे मित्र मंडळ आयोजित, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती निमित्त बुद्ध व भीम गीताचा,जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून बिलोली तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी,समाज व सामाजिक कार्यकर्ते व बिलोली तालुक्यातील सर्व समाज बांधव, व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा,अशी विनंती संदीप भाऊ कटारे नगरसेवक यांनी केली आहे, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब खासदार नांदेड लोकसभा, व श्री शिवानंद कृष्णाजीराव मीनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती विमलबाई दिगंबरराव जाधव सामाजिक कार्यकर्त्या,व भीम गीताचा गायक विपिन तातड झुंड चित्रपट आंबेडकरी रॅपर,व नालंदा सांगवीकर महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका यांचा भीम गीताचा सदाबहार,कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका गायकवाड नांदेड,व प्राध्यापक धम्मपाल जाधव पुरोगामी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष बिलोली, यांनी करणार आहेत व प्रकाशक शिलरत्न जाधव सामाजिक कार्यकर्ते, तरी आंबेडकर समाज आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती,संदीप भाऊ कटारे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.









