अविनाश सोनार तालुका प्रतिनिधी शिरूर
पुणेशिरूर..जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्से येथे कार्यरत असणाऱ्या सौ. श्रद्धा विशाल थोरात (बागुल) यांना मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्या तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ गुणवंत शिक्षिका पुरस्कार मावळ तालुक्याच्या सभापती सौ. सुनीताताई येवले, ज्येष्ठ दिग्दर्शक, पटकथा लेखक श्री. अरविंद जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .कार्यक्रमास प्रबोधन परिवाराचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब औटी,प्रबोधन परिवाराचे संस्थापक श्री. राजू भेगडे तसेच मावळचे माजी सभापती श्री गुलाबराव म्हाळस्कर तसेच इतर मान्यवर सभासद शिक्षक परिवार उपस्थित होते. गेली वीस वर्षे सौ.श्रद्धा विशाल थोरात या मावळ तालुक्यात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.






