सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांनी दिले सूचनापत्र
शासकीय निधीची अवैद्य उचल प्रकरण
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातुर येथील सुप्रसिद्ध महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयाचे तत्कालीन
प्राचार्य यांनी 24 लाख 30 हजार 948 रुपये एवढी अतिरिक्त रक्कम मागणी केल्याचे आढळून आल्यामुळे सदरची रक्कम ही तात्काळ शासन खात्यात जमा करण्यात यावी असे सूचना देणारे पत्र 4 मे 2021 रोजी – सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती डॉ. केशव तुपे
यांनी या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे
शिक्षकेत्तर कर्मचारी यांची एकूण रक्कम 24 लाख 30 हजार 948 रुपये एवढी अतिरिक्त रक्कम मागणी केल्याचे आढळून आल्यामुळे सदरची रक्कम ही तात्काळ शासन खात्यात भरण्यात यावी आणि उर्वरित रक्कम ही प्राचार्य यांनी या कार्यालयात सादर केलेल्या संदर्भीय पत्र क्रमांक 3 नुसार संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या स्तरावर पूनश्च तपासणी करून वितरित करण्यात यावी. असे सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांनी सदर महाविद्यालयाचे प्राचार्य यांना 4 मे 2021 रोजी च्या पत्रानुसार सुचित केले आहे.
महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय पातूर या आपल्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची थकित वेतनाची रक्कम 2 कोटी 56 लाख 58 हजार 21 रुपये एवढ्या रकमेची मागणी सन 2021 च्या थकित वेतना मध्ये केलेली असून त्यानुसार प्राप्त झालेली रक्कम आपल्या महाविद्यालयाच्या वेतन खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेली आहे. मात्र सदर रकमेची पूनश्च तपासणी केली असता
आपण मागणी केलेल्या रकमेपैकी शिक्षक कर्मचाऱ्यांची रक्कम बरोबर असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रक्कम मागणी करतांना आपण महाविद्यालय अनुदानावर आल्यापासून म्हणजेच 6 जून 2013 पासून च्या रकमेची मागणी करणे अपेक्षित होते परंतु आपण तसे न करता त्यांच्या रुजू झालेल्या दिनांकापासून मागणी केलेली आहे ही कृती वित्तीय नियमांचे उल्लंघन करणारी आहे. आपण सादर केलेल्या प्रस्तावाची पुनश्च तपासणी केली असता शिक्षक कर्मचाऱ्यांची मागणी केलेली रक्कम हे बरोबर असून शिक्षकेत्तर कर्मचारी यांची एकूण रक्कम 24 लाख 30 हजार 948 रुपये एवढी अतिरिक्त रक्कम मागणी केल्याचे आढळून आल्यामुळे सदरची रक्कम ही तात्काळ शासन खात्यात भरण्यात यावी आणि उर्वरित रक्कम ही आपण या कार्यालयात सादर केलेल्या संदर्भीय पत्र क्रमांक 3 नुसार संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या स्तरावर पूनश्च तपासणी करून वितरित करण्यात यावी .
याप्रकरणी भविष्यात काही तक्रार किंवा न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्व जबाबदारी ही आहारण व संवितरण अधिकारी म्हणून प्राचार्य यांचीच राहील असे डॉ. केशव तुपे सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांनी केलेल्या ४ मे २०२१ रोजी पत्राद्वारे सुचित केले आहे. या शासकीय निधीची अवैद्य उचल केल्या प्रकरणी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यांना संस्थेने दि. १५ एप्रिल २०२१ रोजी तत्काळ प्रभावाने निलंबित केलेले आहे. निलंबन आदेशाच्या प्रती संस्थेने सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती व कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांना दिल्या आहेत. यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे यांनी प्राचार्या सह११ कर्मचाऱ्यांनी शासनाची व संस्थेची दिशाभूल केल्यामुळे व शासकीय निधीची अवैद्य उचल केल्या प्रकरणी प्राचार्या सह 11 कर्मचाऱ्यांविरुद्ध पातूर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे . सहसंचालक यांच्या पत्रामुळे संस्थेचे अध्यक्ष यांच्या तक्रारीस दुजोरा मिळाल्याचे दिसून येत आहे.
श्री सुभाष बोचरे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातुर
याप्रकरणी मी पातुर पोलिसात ११ एप्रिल २०२१ रोजी प्राचार्या सह ११ कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दिलेली आहे. तर फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 156 (3) नुसार वि. प्रथम श्रेणी न्यायदंडधिकारी पातूर यांच्या न्यायालया मध्ये अर्ज दाखल केलेला असून या फसवणूक प्रकरण तक्रारीच्या प्रति उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदय सावंत तसेच शिक्षण संचालक उच्च शिक्षण पुणे आणि संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती व सहसंचालक अमरावती विभाग अमरावती, जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला आणि बँक ऑफ महाराष्ट्र महात्मा गांधी रोड शाखा अकोला यांचेकडे पाठविण्यात आलेल्या आहेत.


