मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/चामोर्शी तालुक्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडेश्वर देवस्थानची गेल्या दहा वर्षापासून जीर्णोद्वाराचे बांधकामाकरिता मंदिराचा कळस पाडण्यात आलेला आहे सदर बांधकाम पुरातत्व विभागाकडे देण्यात आलेला असून ते काम संत गतीने असल्याने ते बांधकाम तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक आंदोलन उपोषण मोर्चा करण्यात आले मात्र ते बांधकाम संत गतीने सुरू असल्याकारणाने मागील वर्षी एक मार्च 2024 ला श्री संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात मार्कंडा देव येथे उपोषण करण्यात आले मात्र आश्वासनानंतर पुरातत्व विभाग व माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आश्वासनानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले मात्र ते बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही किंवा त्या कामाला सुरुवातही करण्यात आली नाही त्यामुळे ते बांधकाम सुरू करण्यासाठी दिनांक 1 एप्रिल 2025 ला स्थानिक मार्कंडा देव येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली पत्रकार परिषदेला श्री संत मुरलीधर महाराज गंगाधर कोंडूकवर राजू मोगरे मारुती उमलवार अशोक पोरेड्डीवार.संगीता मोगरे .सरपंच मार्कंडा देव मुकुरू पाटील शेंडे रामेश्वर गायकवाड.बबन वडेट्टीवार.विजय कोमरव्वर रितेश पालरपवार. श्री संजय कंदीलवार चपराळा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष .नामदेव पाटील किनेकर सेवक पाटील बोरकुटे मृत्युंजय गायकवाड दशरथ पोटे अनिल भोयर नीलकंठ फाले, रोहित राऊत राजू चिमूरकर सुधाकर दामोदर जुनघरे अशोक किनाके राजेश मोगरे घनश्याम आभारी राजू वासेकर माधव जुनगरे सुरेश भंडावार सिताराम कामिडवार वर्षा सरपे सपना सरपे इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने पत्रकार परिषदेला उपस्थित होते सदर पत्रकार परिषदेत गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले मार्कंडा देव देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत मार्कंडा देव अनेक निवेदन देत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याशी समन्वय साधला मात्र अजून पर्यंत बांधकामाला गती आलेली नाही सदर बाधकाम तातडीने पूर्ण न झाल्यास मोठे जन आंदोलन उभारणार असल्याची माहिती जीर्णोद्धार समितीचे पदाधिकारी व अध्यक्ष संत मुरलीधर महाराज यांनी व्यक्त केली येत्या काही दिवसात गावागावात पदयात्रा काढून जनजागृती करून हे आंदोलन उभारणार असल्याचे श्री महाराज यांनी सांगितले हे आंदोलन मार्कंडा देवालयाचे बांधकामा करिता नसून या विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भावी भक्तांची भावना आपण जनतेसमोर आणि शासनासमोर मोठे जन आंदोलन उभे करून सांगणार असल्याची त्यांनी सांगितले गेल्या दहा वर्षापासून रखडलेला बांधकाम उघड्यावर पाडण्यात आला आहे किती असलेली शिल्पकलेची दगड त्या ठिकाणावर लावण्यात यावी अन्न कुठल्याही भागातला दगड त्या मंदिराला लावू देणार नाही सदरचे बांधकाम हे पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आले असून त्याची निविदा काढण्यात यावी सदर बांधकाम विभागाकडे न ठेवता कोणत्याही कंपनीला देण्यात यावे त्या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होत असून कुठल्याही प्रकारची त्याच्यावर नियंत्रण नसल्याचेही सांगितले पुरातत्व विभागाने स्वतः देखरेख करीत असल्यामुळे या कामाकडे प्रत्यक्षात दुर्लक्ष होत आहे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे पदाधिकारी यांनी बांधकामाबाबत विचारणा केली असता त्यांना कोणताही अधिकार नसल्याचे पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी सांगितले व त्यांना बांधकाम पाहण्यास मज्जाव केला जर हे बांधकाम येत्या दहा दिवसात सुरुवात झाले नाही तर जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातले सर्वात मोठे जण आंदोलन आपण उभारणार असल्याची माहिती सदर पत्रकार परिषदेत देण्यात आली आणि हे आंदोलन गावागावातून जनजागृती करून पैदल काढणार असून मार्कंडादेव देवस्थान येथून सदर आंदोलन जिल्हाधिकारी कचेरीवर काढण्यात येणार असल्याचे सदर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेला सांगितले.


