संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- शेवटी उपोषणाची सांगता केळापूर आर्णी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी उपोषणास्थळी भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते दत्ता गटलेवार यांच्या समस्या जाणून घेऊन लगेच आमदार साहेबांनी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना फोनवरून प्रत्यक्षरीत्या बोलून घटनास्थळी असलेल्या संपूर्ण जनतेला जनते समोर न्यायची मागणी करीत जिल्हाधिकारी तथा महसूल मंत्री यांच्याशी बोलून उपोषणाची सांगता करण्यात आली विशेषता यावेळी आमदार साहेबांनी घाटंजी चे तहसीलदारविजय साळवे यांची बदली झाल्याचे सांगितले असून त्यांना निलबित करण्याचे येईल असे आश्वासन दिल्याने अन्यायग्रस्त उपोषण करता दत्तामामा गटलेवार यांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन उपोषणाची सांगता केली.दरम्यान तीन दिवसाच्या उपोषण उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी व विशिष्ट अधिकारीतिन्ही दिवसात एकही अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने जनतेमध्ये प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे जर एखादा अधिकारी स्थळी भेट दिली असती फार चांगले झाले असते अशा मुजोर तहसीलदाराला धडा शिकवल्याने उपोषण करता दत्ता गटलेवार यांचे तालुक्यात जनते कडून कौतुक करत आहे.


