नंदकिशोर गुड्डेवार शहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील आवळगांव बिटात आवळगांव येथील वृद्ध सकाळी माेहफुल वेचण्याकरीता जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धाचे नाव मनाेहर सखाराम चाैधरी रा.आवळगांव असे असुन पाेटाची खळगी भरण्याकरीता हंगामी माेहफुल वेचुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.त्यासाठी आवळगांव बिटातील कक्ष क्र.११३८ मध्ये माेहफुल वेचण्याकरीता सकाळी जंगलात एकटाच गेला असता अचानकपणे वाघाने त्यांच्यावर हल्ला करून वाघाने ठार केले.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे व मेंडकी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले.या परिसरात वाघांची दहशत असुन भिती निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिक भयभीत जिवन जगत आहेत.त्यामुळे वनविभागाने गस्त वाढवुन वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मनाेहरला पत्नी व मुलगा-मुलगी असा परिवार असुन दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतकाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रूपये देण्यात आले आहे.


