कैलास श्रावणे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
मंगळवार दि.१ एप्रिल ते शणीवार दि.५ एप्रिल २५ रोजी पर्यंत पाच दिवशिय योग शिबिराचे आयोजन जगदंबा माता योग ग्रुप इटावा वॉर्ड पुसद यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दि.१ एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून ३० मिनिटांनी करे योग रहे निरोग हा कार्यक्रम जगदंबा देवी मंदिर स्नेहनगर इटावा वार्ड पुसद आयोजित करण्यात आले होते. जगदंबा देवी योग ग्रुप महिला यांनी पाच दिवसीय योग शिबिर आयोजन केले आहे. आयोध्या वासी अवधेश कुमार सिंग साहेब धर्मप्रचारक प्रफुल्ल विसपुते तथा तिरुपती बिल्डर अँड डेव्हलपर्स पुसदचे संचालक राजेश पिवळटकर,सप्तशृंगी देवी संस्थान इटावा वार्ड पुसद चे संचालक रमेश चव्हाण पाटील, बंजारा काशी पोहरादेवी डेव्हलपर्स नारायण चव्हाण, योगशिक्षक वसंत काळेकर,योग शिक्षिका माया काळेकर श्री कापसे सर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित श्री अवधेश कुमार यांनी योगा बद्दल माहिती सांगितली यावेळी जगदंबा देवी स्नेहनगर इटावा वार्ड पुसदचे सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.योग शिक्षिका सौ.विजया चव्हाण व जगदंबा माता योगा ग्रुप यांनी आयोजन केले होते. मोठ्या प्रमानावर महीला,पुरूषांनी योगाचा लाभ घेतला.सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन प्राध्यापक विशाल जाधव यांनी केले.


