भागवत नांदणे सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात १ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजतच्या सुमरास एका डोकफिऱ्याने चक्क एसटी महामंडळची मागील काच फोडल्याची बातमी समोर आली आहे. तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून शेगाव आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८७१६ प्रवाशी घेऊन वानखेड गावात पोहचली. ग्रामपंचायत समोर बस लावली असता बसच्या मागून दगड फेकून मारल्याने बसचे काच फूटल्याचा आवाज आला. तेव्हा वाहन चालक वाल्मिक तुकाराम पिंगळे वय ५५ रा. शेगाव यांनी बसच्या खाली उतरून पहिले तर एक व्यक्ती हातोडा घेऊन बसच्या मागे उभा होता.त्याला वाहन चालकाने विचारपूस केली असता त्याने आपले नाव प्रकाश पांडुरंग पिंजरकर अशे सांगितले असून मी बसची काच फोडली आहे. मला न्याय पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित जमावाला वाहन चालकाने विचारपूस केली असता त्याची पत्नी मागील १५ वर्षापासून माहेरी गेली आहे. त्याची मनस्थिती ठिक नसून तो नेहमी चिडचिड करत असतो. त्याने रागाच्या भरात बसची काच फोडली. त्यामध्ये एसटी महामंडळचे अंदाजे १ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कलम ३२३ (३) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून सपोनि राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार पोहेकॉ उमेश बोरसे पोहेकॉ विलास पवार हे करत आहेत.


