पोपट नलावडे ग्रामीण प्रतिनिधी – ओतूर
ओतूर ताः-३१ मार्च २०२५येथील प्रसिद्ध कॅट वे स्पोर्ट्स क्लब ओतूर यांच्या वतीने माजी दिवगत खेळाडूंचा स्मरणार्थ भव्य क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले होते.या स्पर्धेमध्ये जवळ जवळ २८ संघ सहभागी झाले होते. याविषयी अधिक माहिती देताना मंगेश आण्णा डुंबरे व पोपटराव नलावडे म्हणाले की, तब्ब्ल २५ वर्षानंतर कॅट वे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने भव्य अश्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा दि. २७ मार्च रोजी १० वाजता ओतूर विक्रम अवचट यांच्या जागेत मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन झाले व स्पर्धाना सुरुवात करण्यात आली. स्पर्धा ३१ मार्च रोजी ठीक सहा वाजता संपली. स्पर्धाचे विजेते अनुक्रमे कॅट वे स्पोर्ट्स क्लब ओतूर, मुरबाड ११ मुरबाड ,शिवनेर स्पोर्ट्स क्लब बोडकेनगर , दोस्ती स्पोर्ट्स क्लब पिंपळगाव जोगा , या संघाना जागतिक विक्रमवीर प्रणव धनवडे,API लहू थाटे साहेब, सरपंच सौ.छाया अतुल तांबे,मा. सभापती विशाल तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, विक्रम अवचट,नानाजीभाई शाहा, गणेश शिंदे, गणेश डुंबरे,पंकज पारखे, प्रेमानंद अस्वार,डुंबरे साहेब ई. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.विजेत्या संघाना अनुक्रमे एकसष्ट हजार, पस्तीस हजार, पंधरा हजार रोख स्वरूपात व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली, यासाठी गणेश शिंदे, गणेश डुंबरे, छायाताई तांबे, आशिष शहा, विशाल तांबे, गोल्डन ग्रुप यांनी रोख बक्षीस दिली, आकर्षक ट्रॉफी सौजन्य -गोल्डन ग्रुप व ओतूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने दिले होते.तसेच. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजेंद्र भनगडे, पोपट नलावडे, रोहिदास डुंबरे, मंगेशआण्णा डुंबरे, सुशील हिंगणे, विष्णू काळे, संदेश पानसरे,दिपक डुंबरे, किशोर कवडे तसेच कॅट वे संघांचे सर्व माजी व आजी सदस्य यांनी नियोजन केले व कॅट वे स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी आर्थिक हातभार लावला. प्रास्ताविक शरद माळवे यांनी केले तर पोपट नलावडे यांनी आभार मानले.


