भागवत नांदणे सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
शेगांव : आज दि. २ एप्रिल रोजी पहाटे साडे ५ वाजताच्या सुमारास शेगाव ते खामगाव रोडवर तिहेरी वाहनांची जबर धडक होऊन ५ जण जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, शेगाव कडून कोल्हापूरकडे जाणारी भरधाव बोलेरो कारने पुण्याकडून परतवाडाकडे जाण्याऱ्या एसटी महमंडळच्या बसला जबर धडक दिली. त्यानंतर पाठीमागून येणारी इंदानी खाजगी प्रवासी लक्झरी बस ही या अपघातग्रस्त दोन्ही वाहनांना जाऊन धडकली. या भीषण अपघातात ५ जणांचा जगीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात काही प्रवाशीच्या हाता पायाला मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच शेगाव व खामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. अपघात इतका भीषण होता की यातील तिन्ही वाहनांचा चुरडा झाला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


