नंदकिशोर गुड्डेवार शहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:परमपूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या कल्पनेतिल ग्रामगीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भु- वैकुंठाचा साक्षात प्रयोग श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित मुख्य संस्था अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी च्या पुढाकाराने व जनतेच्या सहकार्याने गुरुपद गुंफा दर्शन यात्रा तथा गुढीपाडवा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे पूर्वसंध्येला मौजा नवेगाव हुंडेश्वरी येथील भजन मंडळींनी भजन सादर करून जागरण केले. पहाटे सामुदायिक ध्यान, नंतर ध्वजारोहण ,रामधून, पादुका पूजन, सत्संग मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. गावागावातून हजारोच्या संख्येने भाविक गुरुदेव भक्तांनी टेकडीवर येऊन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दर वर्षा प्रमाणेच गुढीपाडवा महोत्सवाच्या निमित्ताने अड्याळ टेकडी येथे भरगच्च यात्रा भरली होती. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीच्या बाजूने नुकतेच न्यायालयीन निर्णय झाल्याने संस्थेच्या वतीने श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी कडून या वर्षाला सुद्धा गुरुपद गुंफा दर्शन यात्रा तथा गुढीपाडवा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. शांतता व सूव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने आदल्या दिवशी पासूनच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोजा अड्याळ ग्रामस्थांकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गुरुदेवावर श्रद्धा असणारे ब्रह्मपुरी येथील अरुणजी पिसे यांच्याकडून थंड पाण्याच्या 200 कॅन उपलब्ध करून भाविक भक्त यात्रेकरू यांची तहान भागविली. नियोजित कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत पार पडला. कार्यक्रमाला ध्यान साधना तळघर मौनस्थ सुरज सयाम गुरुजी, भू-वैकुंठ अड्याळ टेकडीचे अध्यक्ष मोरेश्वर उईके, ज्येष्ठ कार्यकर्ते माजी संचालक तुंडलवार गुरुजी, भुते गुरुजी, नामदेवराव ठाकूर, विश्वनाथजी भेंडारकर, रामकृष्णजी उईके, महिला प्रतिनिधी ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती भागरथाबाई गजभे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ताणबाजी उंबरकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्या करिता रवींद्र उरकुडे, विजय भोयर, विलासराव सावरकर, मधावजी नागापुरे ,कैलास भोयर, गिरीधर अलबनकर, बारुताई ढोंगे, ज्योती शिरपूरकर, माधुरी शेंडे, मंदाताई गुरुनुले, कमलताई सयाम, गजानन प्रधान, पुरुषोत्तम नवघडे, दयारामजी कन्नाके, पेंदाम सर, सारंग दाभेकर, ईश्वर भुते, कैलास सोनुले, मंगेश लांजेवार, गोलू कुसनाके, नितीन पंधराम शुभम नवघडे मधुकर मडावी, देविदास गंडाटे यांनी प्रयत्न केले.


