कैलास श्रावणे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
अन्यथा वंचित आघाडीचा आक्रमक पवित्रा, कार्यकारी अभियंता यांचे विरोधात आमरण उपोषण.इसापूर, दि. ०२ एप्रिल २०२५: इसापूर गावातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी यांनी राज्य महामार्ग २५७ ते इसापूर (LR-२९) रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. या रस्त्याचे काम मागील ६ महिन्यांपासून थांबले असून, त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या रस्त्याची लांबी ३.०० कि.मी असून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन १७ फेब्रुवारी २०२४ रोजी माननीय आमदार श्री. इंद्रनील मनोहर नाईक यांच्या हस्ते झाले होते. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात निवडणुकीपूर्वी झाली असली तरी, निवडणूक संपल्यानंतर काम थांबले आहे.रस्त्याची दुरवस्था एवढी वाईट झाली आहे की, महामंडळाच्या बसेस देखील या मार्गावर येण्यास नकार देत आहेत. या मार्गावर रोज खाजगी वाहनांचे अपघात होत आहेत आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.पर्यटकांनाही या खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालकांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागत आहे.वंचित बहुजन आघाडी पुसद आणि इसापूर गावकरी मंडळी यांनी बांधकाम विभागास २० एप्रिल २०२५ पर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानंतरही कामाला सुरुवात झाली नाही, तर ते २१ एप्रिल २०२५ पासून इसापूर गावात अमरन उपोषण सुरू करणार आहेत.निवेदन देताना खालील वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. बुद्धरत्न भालेराव, भगवान जाधव, माधव मनवर, मुकिंदा थोरात, सर्जेराव मस्के, प्रदीप वाहूळे,शशांक खंदारे, कासम खान, संदीप आढाव, मधुर खिल्लारे, जयानंद भालेराव, मधुकर सोनवणे,अरविंद थोरात असे अनेक गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


