रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
मृत खातेदार यांच्या वारसां ना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजा साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी तेल्हारा तालुक्यात जिवंत सातबारा ही मोहीम राबविली जाणारअसल्याची माहिती तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली आहे.जिवंत सातबारा मोहिमें तर्गत गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधी अधिकार अभिले खामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून संपूर्ण तेल्हारा तालुक्यात जिवंत सातबारा मोहीम’ १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ पर्यंत राबविली जाणार आहे.जमीनमालक यांनी ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याशी संपर्क करून तत्काळ आपल्या वारसांबाबतची नोंद अधि कार अभिलेखात करून घ्यावी. काही अडचणआल्या स मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे यांनी केले आहे.








