मधुकर बर्फे तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण. बिडकीन पोलीस स्टेशन ठाण्यात तत्कालीन कार्यरत असलेले पि.आय.पाटिल कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत चालणार्या सर्व अवैध धंद्याला आळा बसवला होता. चक्री जुगार अड्डे त्यांनी १००% बंद केले होते.परंतु पि आय पाटील यांच्या बदली नंतर निलेश शेळके यांनी बिडकीन पोलीस ठाण्याचा सपोनी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर काही दिवसात बंद असलेले ऑनलाईन चक्री जुगार अड्डे पुन्हा चालू झालेचक्री जुगार मुळे बिडकीन चितेगाव परीसरातील सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी वर्ग बरबाद होत आहे.चक्री जुगार खेळाच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्धवस्त होत आहे. चक्री धद्या बाबत सपोनी निलेश शेळके यांना चक्री जुगार अड्डे तात्काळ बंद करावेत याकरिता सुरक्षा असंघटित कामगार संघटनेच्या वतीने २८.फेब्रुवारी रोजी तक्रार निवेदन सादर केले होते.चक्री जुगार अड्डे बंद करा अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला होता.परतू बि पो ठाण्याचे कर्तव्य दक्ष सपोनी यांना चक्री जुगार चालकांचा खुपचं लळा त्यामुळे ते जाणिवपूर्वक टाळाटाळ करत आहे.करीता कामगार संघटनेचे अध्यक्ष मधुकर सोनाजी बर्फे,व पैठण तालुका पदाधिकारी बाळासाहेब बर्वे, गणेश उघडे,दिलीप जोशी, संजय पवार अशोक काळे,महेश कंठे, गौतम सोनवणे यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन चक्री बाबत सविस्तर माहिती देउन.संघटनेच्या तक्रारीबाबत बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनी यांनी दखल न घेतल्याने ०७.एप्रिल रोजी बिडकीन पोलीस ठाण्याचे हद्दीत ठिय्या आंदोलन करत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांना २८.मार्च शुक्रवार रोजी निवेदन देऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले. बड्या हस्तीचा पाठींबा असलेल्या अनेक ऑनलाईन चकऱ्या खुलेआम चालू आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई होत नाही यामागचे नेमके कारण काय.असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे वेगळा प्यारेग्याप बिडकीन पोलीस कर्मचाऱ्यांकडून गोपनीयतेचा भंग पोलीस प्रशासन अवैध धंदे व ऑनलाईन चक्री, जुगार अड्डे चालकांच्या बाजूने खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे. कामगार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार काही कारणास्तव पोलीस ठाण्याच्या आवारातून ठाणे अंमलदार यांच्याकडे जात असताना त्यांना बघून चक्री चालकांच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने जाणिवपूर्वक एका चक्री चालकांच्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली बरका असे बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो कॉ हनुमान धनवे यांनी चक्री चालकांच्या घोळक्या समोर उद्गार काढले.गोपनीयता उजागर करून वाद निर्माण व्हावा या उद्देशाने गोपनीयतेचा भंग केल्या गेला आहे.


