सरफराज खान पठाण शहर प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : हे प्राचीन, ऐतिहासिक आणि पावन नगरी म्हणून ओळखल्या जाते, परंतु काही काळापासून या पावन नगरीला गुन्हेगारी प्रवृत्ती या रोगाने ग्रासलेले आहे, गुन्हेगारी ने डोके वर काढले आहे .दिवसेंदिवस शहरात गुन्हे, अत्याचार, अवेद्य धंधे,अंमली पदार्थाचे व्यसन वाढत चालले आहे. दि.२८ मार्च रोजी सायं.८.१५ वा.भद्रावती शहरातील भंगाराम वॉर्ड येथील एका युवकाची जादू टोण्याच्या संशया वरून हत्या करण्यात आली होती.भंगाराम वॉर्ड येथील रहिवाशी अमर कुळमेथे आणि रोशन कुळमेथे या दोघा भावांवर जादू टोण्याच्या संशयावरून तेथीलच काही युवकांनी लाठी काठी आणि हत्याराने मारहाण केली असुन या मारहाणीत अमर कुळमेथे याचा जागेवरच मृत्यू झाला आणि दुसरा रोशन कुळमेथे हा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे . हत्येच्या दोन दिवस अगोदर परिसरातील एका महिलेचा मृत्यु झाला होता.महिलेचा मृत्यु हत्त्या झालेल्या कुटुंबियांनी जादूटोना केल्यामुळेच झाला असा समज करुन त्यांचेवर हल्ला करन्यात आला. हल्ला करन्यापूर्वी अंदाजे दहा ते बारा जनांच्या टोळक्याने घराची मोडतोड केली. नंतर दोनही भावांना जबर मारहान करून आरोपी फरार झाले होते, त्यापैकी हत्येचे तीन आरोपी आकाश अरुण सिडाम वय 32 वर्ष ,क्रिश उर्फ लक्की रवींद्र म्हरस्कोल्हे वय 21 वर्ष आणि प्रवीण उर्फ बंटी गेडाम वय 20 वर्ष यांना भद्रावती पोलिसांनी अटक केली. यानंतर भंगाराम वॉर्डातीलच प्रतीक प्रकाश गेडाम वय 28,प्रभाकर गेडाम वय 60,आकाश शालिक म्हरस्कोल्हे वय 34,प्रथम प्रभाकर गेडाम वय 21,पुरब सुधाकर सिडाम वय 37, प्रशांत बलदेव गेडाम वय 22,त्रिशूल कवडू म्हरस्कोल्हे वय 30,शैलेश श्रावण आत्राम वय 21आणि शुभम अशोक इंगोले वय 28 यांना प्रमुखआरोपींना पळून जाण्यास मदत केल्या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी चंद्रपूर बस स्थानक परिसरातून यांना अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही भद्रावती पोलीस ठाणेदार लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे गजानन तुपकर, जगदीश झाडे, निलेश ढेंगे, अनुप आष्टनकर, योगेश घाटोळे, रोहित चिटगिरे, महेंद्र बेसेकर, खुशाल कावळे यांनी केली. भंगाराम वॉर्ड परीसरात तनावपूर्ण शांतता असुन दंगा नियंत्रण पथक, चंद्रपुर परिस्थिति वर नियंत्रण ठेवुन आहे.


