सय्यद एस.एम., शहर प्रतिनिधी अंबाजोगाई.
अंबाजोगाई:- आंबाजोगाई शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग अंबाजोगाई या कार्यालयाने ०१ एप्रिल २०२४ ते ३१मार्च २०२५ या एका वर्षात साडे बारा कोटी रुपयांचा महसूल शासनास वसूल करुन दिला.२०२४ -२५ या आथिर्क वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभाग अंबाजोगाई चे उत्पादन शुल्क निरीक्षक गुरव साहेब, उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कोरे साहेब, व उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक ठोकर साहेब यांनी एकुण ३४४ कारवाया केल्या. यात २४४ वारस ८८ बेवारस कारवाया करत २७७ आरोपींना आटक करण्यात आले.60 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात दुचाकी तीन चाकी व चार चाकी वाहनचाही समावेश आहे. या आथिर्क वर्षात शासनास तब्बल १२५६०५९५० रुपयांचा महसूल ही मिळाला आंबेजोगाई उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत मिळाला. हि कारवाई या विभागात येणाऱ्या परळी केज व अंबाजोगाई या तीन तालुक्यात करण्यात आल्या. या कार्यालयात तीन वर्षापासून कार्यरत असलेले राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक गुरव साहेब समाधानी असल्याचे त्यांचें म्हणणे आहे. मात्र या तिन्ही तालुक्यात खरंच अवैध हातभट्टी उत्पादन व विक्री बंद झाली काय, बनावट दारू अड्डे बंद झालेत का, परवाना धारक दारू विक्री नियमात होते का? दारू विक्री परवाना धारक दुकानदार नियम व वेळेचे बंधन पाळतात का असे अनेक प्रश्न जनता विचारत आहे.








