देवलाल आकोदे
तालुका प्रतिनिधी भोकरदन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधुनगर हसनाबाद या ठिकाणी ग्राम संसद कार्यालय हसनाबाद यांच्या माध्यमातून नुकतेच शालेय मैदानामध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले.त्यामुळे शाळेच्या मैदानाची शोभा व सौंदर्य वाढलेले आहे,यामुळे परिपाठाच्या वेळेस मुलांना विविध सहशालेय उपक्रम घेताना आनंद होत आहे.पूर्वी मैदानावर सगळीकडे धुळच धूळ असायची तसेच पावसाळ्यामध्ये मैदानात पाणी तुंबायचे त्यामुळे मुलांचे कपडे घाण व्हायचे व परिपाठाला अडचण निर्माण झाली होती.ही अडचण लक्षात घेता शिक्षण प्रेमी श्री देवलाल आकोदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी विनंती केली होती.त्या विनंतीला मान देऊन विद्यार्थ्यांच्या या गंभीर समस्येकडे सरपंच श्री सुरेश लाठी काकाजी,उपसरपंच जनाभाऊ खरात व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास श्री गणेश ईरतकर यांच्या पुढाकाराने शाळेसमोर गट्टू बसवण्यात आल्यामुळे शालेय परिसर खुलून दिसत आहे.पुढील शैक्षणिक वर्षात शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे,शाळेला संरक्षक/आवार भिंत व मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह देण्याची ग्वाही(आश्वासन) सरपंच श्री सुरेश काकाजी लाठी यांनी दिली आहे.याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री रामदास लेंभे सर व सहकारी शिक्षकांनी ग्रामपंचायत कार्यालय व सरपंच यांचे आभार मानले आहे.


