रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : दिनांक ३/०१०/२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार ग्रामरोजगार सेवकांना मासिक मानधन ८०००/.व प्रवास भत्ता २०००/. असे एकूण १०,०००/. हजार रुपये मिळावे असे शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले असुन आज रोजी जवळपास सहा महिने लोटुनहि त्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात आली नाही.ग्रामरोजगार सेवक हे आपल्या हलाखीच्या परिस्थितीतून ग्रामपंचायत पातळीवर जबाबदारी पुर्वक काम करीत असुनही ५ -६ महिने मानधन मिळत नसेल तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासात्मक कामे कशी करता येईल तसेच काही रोजगार सेवक आर्थिक विवंचनेतुन आत्मदहन व काम सोडण्याच्या तयारीत आहेत महाराष्ट्र शासनाकडे सर्व योजनेचे नियंत्रण व नियोजन करुन चालवयास पैसे आहेत परंतु ग्रामपंचायत पातळीवर निस्वार्थपणे काम करणाऱ्या रोजगार सेवकांना मानधनासाठी पाच सहा महिने प्रतीक्षेचा सामना करावा लागत आहे.शासनाच्या वतीने ग्रामरोजगार सेवक यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असुन बाकी सर्व स्तरावरील स्थायी कर्मचारी , किंवा अ स्थायी कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी व मानधणावर काम करणारे छोटे मोठे कर्मचारी यांना विहीत वेळेनुसार मानधन मिळतो.मात्र ग्रामरोजगार सेवक पदावर काम करणाऱ्यांना का डावल्या जात आहे असा प्रश्न रोजगार सेवकांमधुन उपस्थित केला जात आहे. जानुन बुजुन शासनामार्फत रोजगार सेवकांचे मानधन देण्यास टाळाटाळ करत असल्याची प्रतिक्रिया रोजगार सेवकांनी लेखी निवेदनातुन केली आहे.या सर्व बाबींचा खुलासा तातडीने शासनामार्फत करून केवळ मानधणावर काम करीत असलेल्या रोजगार सेवकांना मासिक मानधन तथा दिनांक १/०४/२०१७ पासुन ते ३०/०९/२०२४ या कालावधीतील थकित प्रवास भत्ता ,व प्रोत्साहन भत्ता प्रलंबित असून शासन स्तरावर वारंवार लेखी निवेदने देऊनही मिळालेला नाही याकडे शासनाच्या वतीने तात्काळ लक्ष केंद्रित करून प्रवास भत्ता,व प्रोत्साहन भत्त्यासह ५-६ महिन्यांपासून थकीत असलेले मानधन विलंब न करता तात्काळ वितरीत करण्यात यावे.असी मागणी रोजगार सेवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा दिनांक ११/०४/२०२५ पर्यंत आमच्या रास्त मागणी संदर्भात काही तोडगा न निघाल्यास तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक यांच्या वतीने दिनांक १२/०४/२०२५ पासून अनिश्चित कालावधी पर्यंत काम बंद करन्याचा इशारा तालुक्यातील रोजगार सेवक यांनी लेखी निवेदनातुन दिला आहे.


