सदानंद पुरी शहर प्रतिनिधी माहुरगड
माहुरगड … तालुक्यातील मौजे शेकापूर येथील रहिवासी असलेले गणेश मारोती पवार वय ३५ वर्षे व्यवसाय मजूरी रा. शेकापूर ता. माहूर जि. नांदेड यांनी प्रतीक रमेश कोपुलवार राहणार लांजी हल्ली मुक्काम माहूर यांच्या विरोधात माहूर पोलीस स्टेशनमध्ये भा. द .वी.कलम ११५(१),११८(१), ३५२,३५१(१),३५१(२).दि.०१/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०६: ०० वा चे सुमारास फिर्यादी व त्यांच्या गावातील सोबती.देविदास रमेश पवार. अनिल विष्णु चव्हाण. चिंटू इंदल राठोड. प्रविण उत्तम राठोड असे नेर शिवारात पैनगंगा नदी पात्रात जावून नदीपात्रात उतरले असता मौजे लांजी येथील प्रतिक रमेश कोपूलवार हा हातात काठी घेवुन फिर्यादी यांच्या अंगावरआला त्याने त्याला म्हणाला की, तु माझ्यावर चोरीचा आरोप का टाकला म्हणुन शिवीगाळ करून फिर्यादीलाजिवानीशी मारण्याची धमकी देवून हातातील काठीने त्याच्या पाठीवर, पायावर मारहाण केली व गळ्यात दोरी टाकत असतांना फिर्यादीच्या गळ्याला खरचटले आहे त्याने पुन्हा आरोपीने त्याला थापड बुक्क्याने व लाथाबुक्याने मारहाण केली आहे त्यामुळे पाठीवर व पायावर मुक्कामार लागलेला आहे. फिर्यादी पोलीस स्टेशनला येत असताना त्याला खतम करतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याने दि. ०१/०४/२०२५ रोजी उशिराने पोलीस स्टेशन माहूर येथे फिर्याद दिली.फिर्यादीला मारहाण करीत असताना .देविदास रमेश पवार. अनिल विष्णु चव्हाण.चिंटू इंदल राठोड. प्रविण उत्तम राठोड रा. मालवाडा अशांनी पाहुन सोडवा सोडव केली आहे.तरी मारहाण करून जखमी करणा-या व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणा-या प्रतिक रमेश कोपूलवार रा. लांजी ता. माहुर यांचेवर कायदेशिर कार्यवाही करून मला न्याय द्यावा. अशी तक्रार गणेश मारुती पवार यांनी माहूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली आहे. या रेती चोरट्यांनी पहिले ही तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी व पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या असून यांच्या वर आज सुध्दा वचक बसलेली नाही महसूल विभागाला थोड आक्रमक होण्याची गरज आहे नाहीतर हे रेती चोर कुणाचा तरी जीव घेतील यात शंका नाही30 तारखेला जीवाने मारण्या सारखी एवढी मोठी घटना होते व त्याच रात्री त्याच पेंडावर रात्र भर रेती उपसा होते माहूरचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांना खरंच याची काहीच कल्पना नाही का असा प्रश्न माहूर तालुक्यातील जनते मध्ये उपस्थित होत आहे.


