स्वरूप गिरमकर तालुका प्रतिनिधी शिरूर
शिरूर : भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते व संस्थापक अध्यक्ष डॉ.कैलास पवार यांची मुख्य संकल्पना व राज्यातील असंख्य सेवाभावी स्वयंसेवी मान्यवरांच्या सहकार्यातून महात्मा गांधी जयंती दिनी लोकसभागातून जन सर्वांगीण विकास या ब्रीद वाक्याद्वारे स्थापन झाली.छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार महंत श्री स्वामी रामगिरीजी महाराज यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वढू बुद्रुक येथे प्रदान करण्यात आला.त्यानंतर महंत रामगिरीजी महाराज यांनी वाघोली येथील भूमी फाउंडेशन संस्थेच्या शेतकरी कुटुंबातील कृषक कन्या निवासी प्रकल्पाला शुभ आशीर्वाद रुपी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी संस्थेच्या निवासी प्रकल्पातील शेतकरी मुलींनी व सोबत उपस्थितांनी संत चरण पूजन केले.डॉ.कैलास पवार यांनी भूमी फाउंडेशनच्या कार्याचे प्रास्ताविक केले.महंत रामगिरी यांनी संस्थेचा निवासी प्रकल्प व तेथील गरज समजून घेतली.कैलास पवार यांनी स्वतः गरिबी आणि अनाथाचे दुःख जवळून अनुभवले विद्यार्थी दशेमध्ये केलेला कठीण संघर्ष,सहन केलेल्या अनेक हाल अपेष्टा याची जाणीव ठेऊन अशी वेळ आजच्या शेतकऱ्याच्या गरीब,गरजू मुलांवरती येऊ नये. यासाठी पुणे हे विद्येचे माहेरघर ओळखून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील,आत्महत्याग्रस्थ,गरीब,गर जू शेतकऱ्यांच्या मुलींचे उत्तम संगोपन व्हावे व शिक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी वाघोली पुणे येथील निवासी प्रकल्प अनेक सहकार्यांच्या मदतीने उत्कृष्टरित्या चालवीत आहे.या प्रकल्पच्या विकासाकरिता स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले याच्यासारखी दुसरी ईश्वर सेवा नाही.हीच खरी परमेश्वराची पूजा आहे.या प्रकल्पाला कॉर्पोरेट आणि शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात सहकार्य होण्याची गरज आहे.शेतकरी टिकला तर देश टिकेल ही सद्भावना जपण्याचं खऱ्या अर्थाने डॉ.कैलास पवार भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कार्य करीत आहे असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन करत शुभ आशीर्वाद दिले.जयप्रकाश सातव पाटील यांनी महंत रामगिरी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. प्रकल्प व्यवस्थापक अनिता पवार यांनी आभार मानले.याप्रसंगी सरला बेट येथील मधु महाराज,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सातरस,धनराज वाळके,डॉ. अविनाश शर्मा,अशोक घायाळ,डॉ.कैलास पवार,वायुसेना एस के पांडे,भाऊसाहेब कुरकुटे,वाकोडे, मच्छिंद्र दातीर तसेच पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


