सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
क्रांती डोंबे उप विभागीय अधिकारी बिलोलीहद्दपार करण्यात आलेल्या इसमाचे नावशेख सुलेमान शेख अहमद वय ५५ वर्ष रा. बिलोली ता. बिलोली जि. नांदेड हद्दपार करण्यासाठी कामकाज करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार मा. श्री अबिनाश कुमार पोलिस अधीक्षक, नांदेड मा. श्री खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक, भोकर मा.श्री सुरज गुरव अपर पोलिस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री संकेत गोसावी उप विभागीय अधिकारी, बिलोली श्री.अतुल भोसले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बिलोली मा. श्री अबिनाश कुमार साहेब, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस स्टेशन बिलोली येथील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदारांकडुन अशा गुन्हेगारांस कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते.त्यावरुन उक्त नमुद ईसम हा लोकांना त्रास देणे, जनतेमध्ये दादागिरी करणे, विनाकारण लोकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हयातील साक्षीदारावर दबाव आणण्याचे सवयीचा आहे. नियोजित हद्दपार ईसम हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याचे सवयीचा असुन समाजात शांतता भंग करुन दहशत निर्माण करतो. त्याचेविरुध्द ०४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. नियोजित हद्दपार इसमाची विघातक कृत्य करणे या हालचालीमुळे गावातील जनतेच्या जिवित्वास धोका व इजा करणे तसेच मालमत्तेचे नुकसान करणे, या सवयीचा असल्याने त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. तरी त्याचे या वृत्तीस आळा बसावा. गावातील व बिलोली तालुक्यातील परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणतीही अप्रिय घटना घडु नये म्हणुन हद्दपार ईसम शेख सुलेमान शेख अहेमद वय ५५ वर्ष रा. बिलोली ता. बिलोली जि. नांदेड यांनी निर्माण केलेली अवैध कृती यांना पायबंध घालणेसाठी आवश्यक क्षेत्रावरुन शेख सुलेमान शेख अहेमद रा. बिलोली ता. बिलोली जि. नांदेड यास हिंगोली, परभणी, नांदेड, लातुर या जिल्हयातुन १८ महिने करीता हद्दपार करण्याचे आदेश मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब बिलोली क्रांती डोंबे मॅडम यांनी पारीत केले आहे.पोलीस ठाणे बिलोली यांचेकडुन कलम ५६ (क) (ख) म.पो.का. अन्वये वर नमुद इसमांस हद्दपार करण्यासंबंधाने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यामध्ये कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करुन मा. उप विभागीय दंडाधिकारी बिलोली क्रांती डोंबे मॅडम यांनी वर नमुद इसमास नांदेड व लातुर जिल्हयाचे हद्दीत जिल्हयाचे बाहेर १८ महिण्याचे कालावधी करीता हद्दपार करण्याबाबतचा अंतिम आदेश पारीत केला आहे.पोलीस स्टेशन बिलोली हद्दीतील धोकादायक व्यक्तींना स्थानबध्द करण्यासंबंधाने बिलोली पोलीस ठाण्याकडुन सन २०२४-२०२५ या वर्षात एकुण १८ प्रस्ताव पाठविण्यात आले असुन येणा-या काळात उरलेले १७ हद्दपार प्रस्तावाबाबत आदेश येणा-या काळात प्रस्तावित आहेत.


