रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : तालुक्यात दिनांक ३१ मार्च रोजी सोमवारी महागांव शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी साडे आठ वाजता येथील कब्रस्तान असलेल्या ईदर्गा मैदानावर सामुहिक मौलाना यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले.नमाज पठनासाठी महागांव शहर मुलाना जुनुन कलगांव येथील मुस्लिम व अबालवृद्ध हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.रमजान महिन्यात केलेल्या रोजा याची सांगता नमाज पठण करून दिनांक ३१ मार्च रोजी सोमवारी करण्यात आली.रमजान महिन्याचे दिनांक २९ मार्च रोजी या नंतर रविवारच्या संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्याने सोमवारी ईद सर्वत्र उत्साहात व शांतचीतेने पार पाडन्यात आली.शहरातील विविध मस्जितमध्ये साडेसात वाजता मुस्लिम बांधव एकत्र जमले होते.आठ वाजता विद्याकडे रवाना झाले.ताहेर मौलाना यांनी मुस्लिम समाजाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे नमाज पठण करण्यासाठी विदग्याची जागा कमी पडणार असल्याने येणाऱ्या भविष्य काळात ईदग्याची जागा वाढविणे गरजेचे आहे.असे मत व्यक्त केले.समोर बांधकामासाठी निधी सरळ हाताने मदत करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.यावेळी महागांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री धनराज निळे यांनी मुस्लिम बांधवांची जळा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार धनराज निळे यांनी विषेश परिश्रम घेतले.


