धनाजी जोशी तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर तालुक्यातील थडी सावरगाव नगरीचे लोकप्रिय युवा सरपंच योगेश्वर गायकवाड यांनी स्वतः केली नाली सफाई थडी त्यांनी गावात विकास कामाची पाहणी करताना गावातील प्रत्येक रस्त्याच्या बाजूला अनेक नाल्या तुंबल्याचे लक्षात येतात स्वतः युवा सरपंच असून देखील कुठलीच लाज न बाळगता स्वत नालीत उतरून नाली सफाई केली,या साफसफाई बद्दल गावाचं अनेक लोक चर्चा करत आहेत की सरपंच असावा तर,असा आजकाल अनेक सरपंच आपण पाहता ते स्वत इतर लोकांपासून कामे करून घेत असतात पण थडि सावरगावचे युवा सरपंच योगेश्वर गायकवाड यांनी साफसफाई करून आपल्या गावाबद्दल प्रेम व विकास करण्यासाठी तत्पर दाखवली आहे व आपल्या गावातील समस्या, सोडवण्यासाठी व गावाच्याविकासासाठी तरुण वर्ग समोर आला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपल्या गावाचा व आपल्या देशाचा विकास होऊ शकतो योगेश्वर गायकवाड यांचा आदर्श प्रत्येक तालुक्यातील इतर सरपंचांनी घेतला पाहिजे आणि विकासासाठी पुढे आले पाहिजे.


