संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- येथील गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात पार पाडला.पदवी वितरण समारंभ हा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्यानंतर घेण्यात येतो. विद्यापीठाने दिलेली पदवी ही महाविद्यालयीन स्तरावर सर्व विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी हे आयोजन केल्या जाते. उन्हाळी २०२४ परीक्षेमधून जे विद्यार्थी कला, वाणिज्य व विज्ञान स्नातक व स्नातकोत्तर (मराठी व इतिहास) पदवी प्राप्त करून उत्तीर्ण झालेले आहेत अशासर्व विद्यार्थ्यांना याप्रसंगी पदवी वितरित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. शहजाद, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. आर.बी. भांडवलकर तसेच गिलानी महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.वाय. एस. माहुरे, फॅकल्टी व बी.ओ. एस. सदस्य डॉ.टी. एम. कोटक, एन. एस.एस. विभाग प्रमुख डॉ.सी.आर.कासार, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. एन.एस. धारकर आणि विद्यार्थी विकास विभागाचे डॉ.आर.बी. टेंभुर्णे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने व राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एन. मोरे यांनी तर प्रास्ताविक डॉ. एन.एस. धारकर यांनी केले.डॉ. वाय. एस. माहुरे यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवूनमहाविद्यालयाचे नाव मोठे करण्यासाठी कौतुक केले तर डॉ. आर.बी. भांडवलकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना समाजाचे ऋण फेडण्यासाठी गाडगेबाबांच्या दशसूत्रीला अवलंबण्याची सूचना केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. जी.सी.भगत, डॉ. व्हीं.एस. जगताप, ए.पी. भगत, कु.जे.पी.मोरे, डॉ. कविता किर्दक, डॉ.एन.एन. तिरमणवार, डॉ. व्हि. के. जगताप, डॉ. एम. एच ढाले. चेतन शहाकर, राजेंद्र घोडीले, डॉ. सलीम शेख, प्रणित ठाकरे. प्रदीप राठोड, सौरभमाकडे, अमीत ओलंबे, करण किनाके, अनिल कापसे, अंकुश मडावी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.











