भागवत नांदणे सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
संग्रामपूर: महाराष्ट्रात बलात्कार, विनयभंग या सारखे गुन्हे घडतच आहेत. या घटनेमध्ये वाढ होतांना सुद्धा दिसत आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात सकाळी अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवार दि. २० मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमरास पीडित अल्पवयीन मुलगी स्लॅबवर झोपलेली होती. त्याच अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका ४० वर्षीय नराधामाने तिच्या स्लॅबवर चढून तिला वाईट उद्देशाने कवट्यात धरून तिच्या सोबत अश्लील कृत्य करून त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. विनोद रामभाऊ सोनोने वय ४० अशे या आरोपीचे नाव आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सोनाळा येथे अपराध क्र ६८/२०२५ कलम ७४, ७५ भा. न्या. स. सहकलम ८,१२ बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खोने हे करत आहेत.











