अनिस सुरैय्या
तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: महागांव शहरात दररोज रात्रीला फुलसावंगी येथुन लाखोंचा गुटखा येत आहे.परंतु आज परंतु महागांव पोलीसांना या गुटखा माफीयाच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत असल्याचे चीत्र दीसत आहे.महागांव बस स्थानक समोरील चौकतुन फुलसावंगी येथुन महागांव करीता येण्यासाठी एकच रस्ता आहे.तरी सुद्धा हे गुटखा माफीया पोलीस प्रशासनाच्या हाती का लागत नाही हे चर्चेचा विषय आहे.मागील दोन ते तीन वर्षांपासुन हा गुटखा माफीया महागांव शहरात पीकअप वाहनाद्वारे अवैध गुटखा पोहोचवितो आहे.परंतु रात्रिच्या वेळेत बस स्थानक समोरील चौकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्यांना हे गुटखा तस्करी करणारे वाहन का दीसत नाही हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तसेच हे गुटखा तस्करी करणारे वाहन न पकडण्यामागे काही अर्थिक देवान-घेवान होते का,हा चर्चेचा विषय बनला आहे.तसेच बीजोरा येथे प्रतिबंधित खर्राची विक्री खुलेआम सुरु आहे.बीजोरा येथील खर्रा विक्रेता दररोज ४० ते ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित खर्रा खुलेआम पणे विकतो आहे.त्यामुळे या अवैध धंधे करणा-यांवर बीट जमादारांची काही अधिकच महेरबानी आसल्याचे चीत्र सध्या महागांव तालुक्यात बघावयास मीळत आहे.त्यामुळे या अवैध धंधे करणा-या व्यवसायीकांना पकडण्याचे धाडस पोलीस प्रशासन करेल का असा सवाल तालुक्यातिल जनतेकडुन होत आहे.


