रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
श्री संत गाडगेबाबा यांचे संदेशच आपले उदिष्टे माणून आपले सेवा कार्य करणाऱ्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान च्या पाखरां च्या पाणेरी चे जागतिक चिमणी दिनी भागवताचार्य ज्ञानेश्वर वाघ महाराज यांच्या हस्ते लावून उदघाटन कर ण्यात आले. नेहरु युवा मंडळाच्या गेल्या 17 वर्षा पासून श्री संत गाडगेबाबां च्या संदेशावरुन प्रेरणा घेत अविरत अखंडित चाललेल्या पाणेरी पखरा़ंची या अभिया नांतर्गत संत गाडगेबाबा कर्म भूमी सेवा प्रतिष्ठान च्या संयु क्त विद्यमाने भैरवगड वारी हनुमान येथिल आश्रमाचे मठाधिश तथा वारकरी संप्र दायाचे अविभाज्य श्री.संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर ,श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ मठाधिश ह. भ. प. श्री.ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या हस्ते गुणवंत नगर येथील श्री संत गुणवंत बाबा मंदिर परिसरात पाणेरी पाखरांची लावण्यात आली.
या वेळी संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष मिलिंद तायडे यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला तर ह. भ. प.श्री. गोपीनाथ शास्त्री झोड महाराज , संत गाडगेबाबा यांच्या मामकुळातून पमतू लागणारे श्रीकृष्ण कोळसकार यांची प्रमुख उपस्थीती तर नेहरु युवा मंडळाचे कोषाध्यक्ष सुनिल डाहेलकर,रविंद्र झोड,धिरज भारे पुजा काळे, सौ.संध्या डाहेलकर,शालिग्रामजी थुंकेकर, सुखदेव पवार चि. गुरु झोड आदींची उपस्थिती होती.


