कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचा 21 मार्च 2025 रोजी 102 वा वाढदिवस मध्य प्रदेश येथील छिंदवाडा येथे मोठ्या प्रमाणात व भव्य स्वरूपात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी 140 पेक्षा जास्त देशातील सहज योगी तसेच भारतातील प्रत्येक राज्यातील सहज योगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 21 मार्च 1923 रोजी श्री माताजींचा जन्म मध्य प्रदेशातील छिंदवाडा या ठिकाणी झाला. भौगोलिक रित्या छिंदवाडा हे गाव भारताचा मध्यबिंदू आहे तसेच 21 मार्च हा दिवस वर्षाचाही मध्यबिंदू म्हणजे बारा तास रात्र आणि बारा तास दिवस अशी ही तिथी आहे. बुलढाणा जिल्ह्यातून प्रत्येक सेंटर वरून सहज योगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे रवाना झाले आहेत. गेल्या तीन दिवसापासून छिंदवाडा येथे श्री माताजींचा वाढदिवस कार्यक्रम साजरा होत आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा चिखली खामगाव शेगाव तसेच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा अकोट आडगाव अकोला येथील सहज योगी सुद्धा मोठ्या संख्येने छिंदवाडा येथे रवाना झाले आहेत. याच श्री माताजींच्या आश्रम साठी संग्रामपूर येथे माननीय आमदार संजय कुटे यांनी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता. अशा परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचा वाढदिवस पूर्ण 140 देशांमध्ये आज 21 मार्च रोजी साजरा होत आहे.


