सुधीर जाधव जिल्हा प्रतिनिधी, सातारा
सातारा : आंबवडे बु. येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग सातारा यांच्या वतीने शेतीसंबंधी विविध विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शासनाच्या वतीने मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत साळुंखे, सुशांत देसाई कृषी पर्यवेक्षक, शैलेंद्र वाघमळे कृषी सहाय्यक, अनिकेत शेळके कृषी सहाय्यक यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करताना, शेतीसंबंधी असणाऱ्या योजना व त्यांची उद्दिष्टे शेती आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्या संबंधी माहिती देत असताना या योजनेत शेतकऱ्यांनी सामील होण्यासाठी काय करायचे याचे सविस्तर सांगितले. शेतकरी समृद्ध व शेती सुपीक होण्यासाठी मधुमक्षिका पालन या योजनेत मध गोळा करणे व मधमाशांचे संगोपन याची माहिती व फायदे, त्याचबरोबर कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून मिळणारी अवजारे व अनुदान, शेतीमालावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग, पॉलिहाऊसच्या माध्यमातून उत्पादन घेऊन उत्पन्नामध्ये वाढ, फळबाग योजना, गहू, ज्वारी पिकासंदर्भात मार्गदर्शन आणि विषमुक्त शेती करण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा आव्हान शेतकऱ्यांना केले. या शेती कार्यशाळेस शेतकरी गटाचे पदाधिकारी महेश जाधव, सचिन देशमुख, सुभाष जाधव, गुलाब जाधव, दीपक पिलावरे, अर्जुन मोरे, संदेश मोरे, लक्ष्मण देशमुख, दत्तात्रय देशमुख, प्रेमनाथ जाधव उपस्थित होते.


