भरत पुंजारा ग्रामीण प्रतिनिधी पालघर
ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पूज्य आचार्य भिसे विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर घालण्यात आला.मुख्याध्यापिका अनघा गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक सी. एस. पाटील सर यांनी मराठी भाषा ही आपली मातृभाषा असल्याने तिचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून कासा गावचे उपसरपंच हरेश मुकणे सर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक सी. एस. पाटील, उपसरपंच हरेश मुकणे, चौरे सर, खाडे सर, निलेश गायकवाड, शशिकांत ठाकूर, पंकज पाटील, राहुल खडके, कांटेला मॅडम, फिरके मॅडम, खाडे मॅडम, खाडे सर, वैशाली पाटील, संगिता अहिरे ल, तांबडा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी मराठी गौरव गीते, साहित्य परिचय नाटिका, ‘बोलू मराठी’ हा विविध बोली भाषांवर आधारित कार्यक्रम, तसेच वऱ्हाडी, अहिराणी, झाडी बोली, आगरी, मांगेली, मालवणी, आदिवासी या बोली भाषांतील संवाद सादर केले. महाराष्ट्र राजभाषा गीत, मराठी गौरव गीत आणि ‘मी मराठी’ नृत्य विद्यार्थ्यांनी उत्साहात सादर केले. विशेष म्हणजे आदिवासी बोली भाषेतून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे नाटक सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमराज साळुंखे यांनी केले, तर प्रास्ताविक आर. आर. पाटील सर यांनी सादर केले. मुख्याध्यापिका अनघा गायकवाड मॅडम यांचे मोठे सहकार्य लाभले. यशस्वी आयोजनासाठी हेमंत रणखांबे, नितीन बोंबाडे, कामिनी शिंदे, मानवी पानेरे, भास्कर बोरसे, वंदना बोरसे, प्रचिता चुरी, अलका भोई,यांनी मेहनत घेतली. आभार प्रदर्शन शारदा पाटील यांनी मानले. चिंचणी महाविद्यालय, वाणगाव ज. म. ठाकूर विद्यालय, डहाणू करंदिकर महाविद्यालय, पोंदा हायस्कूल आणि परिसरातील अन्य विद्यालयांमध्येही मराठी गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले.











