विश्वास काळे
उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल विजय वडेट्टीवार आमदार(काँग्रेस पक्ष) ब्रह्मपुरी (चंद्रपूर) मतदार संघ यांनी केलेल्या अपमानास्पद विधानाचा आज रोजी स्व स्वरूप संप्रदाय तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ चे वतीने जाहीर निषेध करत सांप्रदायातील भक्तगणांनी निदर्शन केले. उमरखेड तालुका संप्रदायातील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या ४००ते ५०० शिष्य, साधक व भक्तगणांनी माहेश्वरी चौकात निदर्शने करून निषेध नोंदवत आपला मोर्चा उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयापर्यंत नेऊन विजय वडेट्टीवर यांनी केलेल्या अपनास्पद विधाना बद्दल जाहीर माफी मागावी या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना देऊन आमची मागणी शासन दरबारी पोहोचवावी अशी विनंती केली, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त मंडळ उमरखेड जिल्हा यवतमाळ (पश्चिम) चे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच असंख्य शिष्य, साधक व भक्तगणमंडळी उपस्थित होती.

