रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांना संस्थेच्या व्यवहारात थकबाकी राहता येत नाही.थकबाकी राहणारे सदस्य संस्थेच्या नियमानुसार ते संस्थेचे संचालक म्हणून कार्यान्वित राहण्यास अयोग्य ठरतात.विषेश माहिती नुसार महागांव तालुक्यातील पोखरी येथील संस्थेच्या आठ सभासदांना यापूर्वी थकबाकी रक्कम भरणा करन्याचे आदेशीत करन्यात आले होते.विवीध सहकारी संस्थेच्या संचालकांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी रक्कम भरन्यास कसुर केल्याने आठही संचालकावर अपात्रतेच्या कार्यवाहीचे आदेश धडकले आहे.पुसदचे सहायक निबंधक सुनील भालेराव यांनी नुकतेच त्यांना अपात्र घोषित केले आहे.प्रल्हाद महाजन, गजानन मोटे, गजानन राठोड,संदिप राठोड, गजानन पाडोंळे, पंजाब आगोसे,व अश्विनी कदम,असे अपात्र घोषित करण्यात आलेल्या सोसायटी संचालकांची नांवे आहेत.सविस्तर वृत असे की १२ फेब्रुवारी रोजी या संबंधात सहायक निबंधक सहकारी संस्था श्री सुनील भालेराव यांनी आदेश निर्गमित केले आहे.या आदेशानुसार वरील संचालकांचे संचालक पद रद्द करण्यात आले असल्याचे आपल्या आदेशात नमूद केले आहे.महाराष्ट सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमं ७३ कॳ (१) (अ) सचिव विवीध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.पोखरी यांचा २६ जुन २०२४ रोजीच्या अर्जानुसार पोखरी येथील आठ संचालक संस्थेचे थकीत सदस्य असल्याबाबत अर्जात नमूद असल्याने कायद्यातील तरतुदीनुसार सहायक निबंधकांनी संबंधित संचालकांना नोटिसा बजावल्या होत्या.तसेच थकबाकी असणाऱ्या संबंधित संचालकांना उत्तर दाखल करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देउनहि उत्तर दाखल करण्यात आले नाही.व थकबाकी असलेल्या कर्जांचा भरणा करन्यात आला नाही.याबाबत सहायक निबंधक सहकारी संस्था श्री सुनील भालेराव यांनी थकबाकी असलेल्या आठही संचालकांना अखेर अपात्र घोषित केले आहे.अपात्र घोषित केलेल्या संचालकांना आता पाच वर्षे निवडणूक लढवीता येणार नाही असे सहाय्यक निबंधक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केले आहे.


