आनंद मनवर
रायगड प्रतिनिधी
पाली : आज दिनांक 24 फेब्रुवारी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे महाराष्ट्र समन्वयक व वरिष्ठ प्रशिक्षक देव गोसकी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी शाळा, पडसरे, ता. सुधागड, जि. रायगड येथे मुलांसाठी उत्कर्ष योगा व मेधा योगा कोर्स नुकताच संपन्न झाला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना मनःशांती, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विविध तंत्रे शिकवण्यात आली. या कोर्समध्ये शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी श्वसन तंत्र, ध्यान, योगासने आणि सकारात्मक विचारसरणीचे धडे देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात तसेच दैनंदिन जीवनात अधिक सक्षम होण्यासाठी फायदा झाला. या प्रशिक्षणात शाळेतील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना यातून मोठा आत्मविश्वास व ऊर्जा मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांचे आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक करण्यात आले. या कोर्ससाठी प्रशिक्षक म्हणून गोरख डांगे, माऊली दोबोले हे होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. घोलप, अशोक महामुनी साहेब, पाली टीम, माधमिक मुख्याध्यापक शिंदे सर,प्राथमिक मुख्याध्यापिका ढोपे मॅडम, सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

