विनोद कांबळे तालुका प्रतिनिधी पुसद.
एका युवकाने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या बद्दल अक्षपारहा विधान केल्यामुळे पुसद शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही घटना गुरुवार दिनांक १३/२/२०२५ रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार गुरुवारी दुपारी २ ते ३ दरम्यान एका युवकाने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या बद्दलआक्ष पारह विधान केल्यामुळे पुसद शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावर पोलीस प्रशासन ने त्वरित ॲक्शन मोड वर येऊन आरोपीचा शोध घेणे सुरू झाले. व सदर आरोपी हा शहरातील एका महाविद्यालयात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सदर महाविद्यालयात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. यानंतर समाज बांधवांनी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे जाऊन या आरोपी विरुद्ध तक्रार दिली व त्यानंतर यातील काही समाज बांधवांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर पोलीस प्रशासनाने सदर समाज बांधवांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली..

